रहटणीत जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहटणीत जुन्या भांडणाच्या 
कारणावरून एकावर कोयत्याने वार
रहटणीत जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार

रहटणीत जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : जुन्या भांडणाच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार केले. ही घटना रहाटणी येथे घडली. या प्रकरणी प्रवीण दिनकर देवकर (वय २१, रा. रामनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू तलवारे (वय २०), अजय कांबळे (वय २१), सुनील कांबळे (वय १९) संदीप (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्यांचे तीन चार साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र सुमीत शिंदे हे दोघे चहा पिण्यासाठी रामनगर येथील टी सेंटर येथे गेले होते. दरम्यान, फिर्यादी यांचा भाऊ प्रथमेश यांचे चार मित्र तेथे आले. त्यांनी आणखी तीन ते चार मित्रांना बोलावून घेतले. प्रथमेश यांची त्यांच्या मित्रांबरोबर एका जयंतीच्या मिरवणुकीत भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी प्रथमेश यांचा भाऊ फिर्यादी प्रवीण याच्यावर कोयत्याने वार केले. तेसच लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत माजवली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बावधनमध्ये अडीच लाखांची घरफोडी
दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी महेंद्र गुणारामजी चौधरी (वय ४२, रा. पाटील हाईट्स बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या पत्नी कन्यादेववी या घराच्या दरवाजा लॉक करून बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी अज्ञात चोरट्याने कशाचे तरी साहाय्याने घराचा दरवाजा उघडला. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील एक सोन्याचे गंठण, एक सोन्याचा बोरहार, एक सोनसाखळी, एक अंगठी, एक चांदीचा कंबरपट्टा असे एकूण २ लाख ५२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ऑनलाइन बुकींगच्या नावाखाली फसवणूक
लेह, लडाख येथे फिरायला जाण्यासाठी टूर कंपनीने एका कुटुंबाकडून ऑनलाइन पद्धतीने ८० हजार ८०० रुपये घेतले. मात्र, कोणत्याही प्रकारचे विमानाचे तसेच हॉटेलचे बुकिंग केले नाही. तसेच टूरला जाण्याच्या दिवशी सकाळी फोन करून टूर पुढे ढकलल्याचे सांगत या कुटुंबाची फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. याप्रकरणी विक्रांत सूर्यकांत भोंगळे (वय ३२, रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लेट्स प्लॅन आउट कंपनी व जयेश जगदीश मीना ( रा. उलवे, नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना फिरण्यासाठी लेह, लडाख व जम्मू-काश्मीर येथे फिरायला जायचे होते. त्यासाठी फिर्यादी यांनी लेट्स प्लॅन आउट या कंपनीच्या मार्फतीने आरोपी जयेश मीना यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने ८० हजार ८०० रुपये पाठवून बुकिंग केले. बुकिंग केल्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांचे विमानाचे तिकीट, हॉटेल बुकिंग केले नाही. टूरला जाण्याच्या दिवशी अचानक टूर पुढे ढकलली आहे, असे खोटे कारण सांगितले. यातून आरोपींनी फिर्यादी यांची ८० हजार ८०० रुपयांची फसवणूक करून मानसिक त्रास दिला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10261 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..