जुनी सांगवीत विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत विविध उपक्रम
जुनी सांगवीत विविध उपक्रम

जुनी सांगवीत विविध उपक्रम

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १३ ः अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, पदयात्रा शोभायात्रेने सांगवी परिसरात देशभक्तिमय वातावरणात घरोघरी नागरिकांनी तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला. भाजपच्या वतीने माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, जे. डी. ग्रुप, बालाजी प्रतिष्ठाण,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, नृसिंह हायस्कूल यांच्या वतीने शितोळेनगर, गजानन महाराज मंदिर, गावठाण, एकता चौक या मार्गावरून ढोल-ताशा पथक व सजवलेल्या रथातून पदयात्रा काढण्यात आली. यात नागरिकांसह विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक संघांनी सहभाग घेतला.‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊॅंचा रहे हमारा, वन्दे मातरम्, भारत माता की जय’च्या जयघोषात ठिकाणी चौकांमधून नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. माजी महापौर उषा ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, जवाहर ढोरे, तृप्ती कांबळे, अनुश्री ढोरे, राणी ढोरे, वसंत कांबळे, चंद्रकांत बाराथे, बाळासाहेब सोनवणे यांनी पदयात्रेचे संचलन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10265 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..