उद्यान विभाग ः आतापर्यंत ५५० धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या जुन्या झाडांचा प्रश्‍न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यान विभाग ः आतापर्यंत ५५० धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या 
जुन्या झाडांचा प्रश्‍न ऐरणीवर
उद्यान विभाग ः आतापर्यंत ५५० धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या जुन्या झाडांचा प्रश्‍न ऐरणीवर

उद्यान विभाग ः आतापर्यंत ५५० धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या जुन्या झाडांचा प्रश्‍न ऐरणीवर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : धोकादायक झाडांमुळे दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, या धोकादायक झाडांचे सर्वेक्षण होत नसून, नागरिकांच्या मागणीनुसार फांद्या छाटण्याचे काम केवळ उद्यान विभाग करत आहे. पावसाळ्यात आत्तापर्यंत ५५० धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या असल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी, महापालिका उद्यान विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वादात नाशिक महामार्गावरील जुन्या झाडांचा प्रश्न वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. या मार्गावरुन नियमित जाणाऱ्या नागरिकांनी एक प्रकारे धसका घेतल्याचे चित्र समोर आले आहे.

नाशिक महामार्गावरील सर्व झाडे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याचे उद्यान विभागाने सांगितले. त्यामुळे, महापालिकेला निर्णय घेता येत नाही. त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील अद्यापपर्यंत या भागातील धोकादायक झाडांची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, पर्यावरणप्रेमींनी विदेशी झाडांचे रोपण न करण्याची मागणी केली असून, देशी झाडांचे संगोपन अभ्यासपूर्वक करावे. त्यानुसार झाडांना असलेले सिमेंट ब्लॉक व जाळ्या हटविण्याची मागणी केली आहे.
----
शहरात जूनपासून १८ ते २० झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. धोकादायक असणाऱ्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा झाडांना वेळीच काळजी घेऊन काढणे आवश्यक आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. सकाळची वेळ असल्याने या रस्त्याने विविध कामांसाठी जाणाऱ्या वाहन चालकांची रस्त्यावर गर्दी होती. शनिवारी (ता. ६) याच मार्गावरील गुडविल चौकाजवळ दुचाकीवरील दोघाजणांवर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास सुबाभळीचे झाड कोसळल्याने चालकांच्या काळजाचा ठोका चुकला. तसेच, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर पुन्हा दोन झाडे पडली. भोसरी ते नाशिक फाट्यादरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपैकी सहा झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र ही झाडे रस्त्यापासून काहीशी दूर अंतरावर असल्याने जीवितहानी घडली नाही.
---
वृक्ष पडण्याची कारणे
१) गुलमोहर ही मूळ भारतीय प्रजाती नसल्याने ही झाडे एक-दोन वर्षांत उंच वाढतात. त्यांची मुळे जमिनीत खोलवर न गेल्याने ते फार काळ टिकू शकत नाहीत.
२) रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक असल्याने झाडे पसरण्याची संधी मिळत नाही.
३) परदेशी वृक्षांची लागवड करणे, वारंवार रस्ते खोदणे, डांबरीकरण किंवा काँक्रिट टाकणे
४) झाडांची अयोग्य पद्धतीने फांद्या छाटल्यामुळे संतुलन बिघडते.
--
धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी देखील वारंवार अशा पद्धतीची कामे सुरु असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने त्यांच्या सोबत बोलणे झाले आहे. परंतु, काही प्रतिसाद मिळाला नाही. आजही धोकादायक फांद्या काढण्यास गाडी पाठवली आहे. तसेच, पावसामुळे मुळांमध्ये माती राहिली नाही. त्यामुळे, ती तग धरत नाही. जोरदार पावसात उन्मळून पडत आहेत.
-सुभाष इंगळे, उपायुक्त, महापालिका
---
झाडे पडण्याची काही नैसर्गिक कारणे आहेत. विदेशी झाडे ठरावीक उंचीपर्यंत वाढली की, ती पडतात. झाडांचे खोड रुंद व्हायला जागा मिळायला हवी. झाडांभोवती काही अंतरावर ब्लॉक करणे किंवा जाळ्या करणे. यामुळे, खोड नाजूक राहते. वाढ नीट होत नाही. काही नागरिकांना झाडे अडचणीची वाटू लागली की, नको असतात. त्यामुळे, काही जण झाडांच्या मुळाशी मीठ किंवा विष टाकतात. परिणामी, झाड उन्मळून पडते. शक्यतो, उद्यान विभागाने विदेशी झाडे लावू नयेत. देशी खोडांचा विस्तार नीट व्हावा यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
- उपेंद्र धोंडे, पर्यावरण अभ्यासक

--
आमच्या हद्दीत नाशिक महामार्गावरील झाडे येत नाहीत. राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत असेल.
- बाप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10269 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..