अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली सांगवीत पुस्तकरूपी दहीहंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली 
सांगवीत पुस्तकरूपी दहीहंडी
अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली सांगवीत पुस्तकरूपी दहीहंडी

अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली सांगवीत पुस्तकरूपी दहीहंडी

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता.२० ः जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वेताळ महाराज सोसायटी व सुवर्ण युग मित्र मंडळाच्यावतीने पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्र संस्थेच्या अंध व दिव्यांग मुलांनी पुस्तकरूपी दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला.

दिव्यांग मुलांसाठी श्रीमती विठाबाई शितोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व्यक्तिगत उपयोगाचे साहित्य, हेडफोन भेटवस्तू देण्यात आल्या. परिसरातील बालगोपाळांनी दिव्यांग मुलांसोबत गोकुळाष्टमीचा आनंद साजरा केला. दहीहंडी फोडल्यानंतर आश्रमातील मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी आकाश साळवे, चेतन शिरसाठ, विशाल केंडे सह आश्रमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सुवर्णयुग मंडळाचे सागर खोपडे, अक्षय निगडे, मनीषा योगेश शितोळे, कृष्णा शितोळे, गोजिरी खटावकर, तणव भट, सोहम कांबळे, हेमलता शिळीमकर, मनिषा शितोळे आदी उपस्थित होते. शिक्षिका मीरा देशमुख, तुषार कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

औंध हॉस्पिटल परिसरात वाल्मीकी पंचायत मित्र मंडळाच्यावतीने महर्षी वाल्मीकी यांच्या मंदिराला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. या वर्षी शासनाने निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. वीर गोगादेव भजन कीर्तन करण्यात आले. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण भजन व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक धनराज बिर्धा, संजय मराठे, पंकज सारसर, सत्यवान ग्यानी आदी उपस्थित होते.

नवी सांगवी येथे आदिलक्ष ग्रुपच्यावतीने बालगोपाळांना शैक्षणिक साहित्य व पुस्तक वाटप करण्यात आले. जुनी सांगवीतील अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी अंगणवाडी क्रं. १८ मुळानगर येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अंगणवाडी सेविका सारिका अहिवाळे, ज्योती कुलकर्णी यांनी आयोजन केले.