‘नाना काटे फाउंडेशन’तर्फे गरजू विद्यार्थ्याला भेटवस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाना काटे फाउंडेशन’तर्फे 
गरजू विद्यार्थ्याला भेटवस्तू
‘नाना काटे फाउंडेशन’तर्फे गरजू विद्यार्थ्याला भेटवस्तू

‘नाना काटे फाउंडेशन’तर्फे गरजू विद्यार्थ्याला भेटवस्तू

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २१ ः पिंपळे सौदागर, रहाटणी भागात घरोघरी वृत्तपत्रे वाटपाचे काम करत शिक्षण घेणाऱ्या सुजित टारझन सिंग या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला नाना काटे सोशल फाउंडेशनच्यावतीने सायकल व स्कूल बॅग भेट देण्यात आली. समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे नाना काटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत. नुकताच परिसरातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा व शालेय साहित्य वाटप फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले.

सुजित हा घरोघरी वृत्तपत्रे वाटपाचे काम करत घराला व स्वतःच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहे. त्याच्या जिद्द व चिकाटीचा गौरव व्हावा. त्याला शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलचा उपयोग होईल. आपल्या प्रभागातून दररोज समस्या व विकासकामे याची पाहणी करत असताना यावेळी त्यांच्या नजरेत सुजित टारझन सिंग हा मुलगा पिंपळे सौदागर परिसरात दैनंदिन पेपर टाकण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. त्याला थांबवून त्याची माहिती घेतली. सुजित हा वडीलासोबत राहत असून तो दररोज १५० घरी जाऊन पेपर टाकत आपले शिक्षण पूर्ण करत असल्याचे माहिती समोर आली. त्याचे वडील टारझन सिंग एका सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने शिक्षणाबरोबर त्याला लहान मोठी कामे करावी लागत आहे. अशा कष्टाळू व गरजू विद्यार्थ्याला सहकार्य करणे हे आपले दायित्व आहे, असे नाना काटे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10283 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..