तालेरा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद अवस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालेरा रुग्णालयातील 
सोनोग्राफी मशिन बंद अवस्थेत
तालेरा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद अवस्थेत

तालेरा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद अवस्थेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : चिंचवड गावातील महापालिकेच्या तालेरा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन तब्बल दीड वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. परिणामी गर्भवती महिलांची हेळसांड होत आहे.
तालेरा रुग्णालयात आंतररुग्ण विभागात महिलांचा प्रसूती विभाग आहे. औषध आणि इतर काही विभागाचे केवळ बाह्य रुग्ण विभाग सुरू आहेत. या रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू असूनही येथील सोनोग्राफी मशिन गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. यामुळे गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तालेरा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या रुग्णालयात मेडिसीन कान-नाक-घसा, नेत्र विभाग, स्त्रीरोग तज्ज्ञ होते. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया तालेरा रुग्णालयात होत होत्या. तालेरा रुग्णालयाचा विस्तार करून नवीन इमारत उभारण्यात आली. यामुळे चिंचवडकरांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल, अशी आशा होती. मात्र तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याचे सांगत ती पाडण्यात आली. यामुळे येथील अनेक विभाग बंद करण्यात आले. अद्यापही नवीन इमारतीचे ३० टक्के काम बाकी असून ते कामही संथगतीने सुरू असल्याने येथील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

विस्तारीकरण केलेल्या इमारतीमध्ये आंतररुग्ण विभागात महिला वॉर्ड आणि प्रसूती विभाग सुरू करण्यात आला आहे. बाह्य रुग्ण विभागात पुरुष मेडिसीन, महिला मेडिसीन, रक्त तपासण्या आदी विभाग सुरू आहेत. तसेच कोरोना चाचणी आणि लसीकरणही याच इमारतीमध्ये केले जाते.

चिंचवडच्या मंदा जांभूळकर म्हणाल्या, ‘महिला प्रसूती वॉर्ड असूनही याठिकाणी सोनोग्राफीची सुविधा नाही. कोरोनापासून येथील सोनोग्राफी मशिन बंद असून ती दुरुस्त करण्यात आलेली नाही.’

विंदा कदम म्हणाल्या, ‘या भागात दोन दवाखाने असूनही नागरिकांना, महिलांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत.’

सागरिका जाधव म्हणाल्या, ‘दीड वर्षांपासून सोनोग्राफी मशिन बंद पडून आहे. नागरिकांना थेरगाव दवाखान्यात पाठवले जात आहे. गर्भवती महिलांना हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाला कधी जाग येणार?’

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10289 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..