शनिवार, रविवारीही होणार दस्तनोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवार, रविवारीही
होणार दस्तनोंदणी
शनिवार, रविवारीही होणार दस्तनोंदणी

शनिवार, रविवारीही होणार दस्तनोंदणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः दस्त नोंदणीसाठी काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी व रविवारी सुरू राहणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री पावणे नऊपर्यंत आता नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शनिवार व रविवारी सुरू असलेली कार्यालये बंद करण्यात आली होती. तसेच सकाळच्या व दुपारच्या सत्रात सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सकाळी ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू ठेवण्यात येत होती.
नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची सुविधा शनिवार व रविवारीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील २७ कार्यालयापैकी ७ कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उर्वरित कार्यालये सकाळी ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहणार आहेत, असे पारखे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10291 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..