उपनगरात देखावे पाहण्यासाठी गर्दी पावसाची उसंत ः आबाल-वृद्धांसह कुटुंबीयांमध्ये उत्साह, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरात देखावे पाहण्यासाठी गर्दी
पावसाची उसंत ः आबाल-वृद्धांसह कुटुंबीयांमध्ये उत्साह, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर
उपनगरात देखावे पाहण्यासाठी गर्दी पावसाची उसंत ः आबाल-वृद्धांसह कुटुंबीयांमध्ये उत्साह, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर

उपनगरात देखावे पाहण्यासाठी गर्दी पावसाची उसंत ः आबाल-वृद्धांसह कुटुंबीयांमध्ये उत्साह, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ३ ः सांगवी परिसर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर भागातील रस्ते गणेशोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेले आहेत. यावर्षी मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत. देखावे व पावसाने दिलेली उसंत यामुळे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. बालगोपाळांसह गेली दोन वर्षांपासून प्रथमच सहकुटुंब गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत नागरिकांचा उत्साहाने देखावे पाहण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
श्री गणेश मित्र मंडळ गणेशनगर पिंपळे निलखचा विघ्नहर्ता, शिवाजी चौक मित्र मंडळाची फुलांची केलेली आरास, छत्रपती युवा प्रतिष्ठान व शिरीष आप्पा साठे मित्र मंडळाचा गणेश महाल देखावा, शिवाजी तरुण मंडळांनी फुलांच्या आरास व समाज प्रबोधनावर भर दिला आहे. श्री छत्रपती क्रीडा मंडळाने पत्रावळी व द्रोण यापासून सुंदर विद्युत रोषणाई केलेला देखावा साकारला आहे.
पिंपळे सौदागर रहाटणी गाव चौकात शिवछत्रपती तरुण मंडळांनी सादर केलेला कृष्ण लीलावर आधारित कालिया मर्दन हा हलता देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शिवछत्रपती क्रीडा संस्था यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पिंपळे सौदागर येथील विश्वशांती प्रतिष्ठान या मंडळांनी शिवकालीन रथ, क्रांती क्रीडा मंडळाचा जलपरी महल हा भव्य देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यावर्षी क्रांती मित्र मंडळाने सहा फूट उंचीची आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. पिंपळे सौदागर गावठाण येथे जय महाराष्ट्र तरुण मंडळांनी पौराणिक भव्य मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. पिंपळे सौदागरचा राजा स्पोर्ट्स क्लबने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पिंपळे गुरव सुदर्शन नगर येथील शिवप्रताप प्रतिष्ठान मंडळाच्यावतीने बाप्पांची प्रतिष्ठापना करून विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे. भैरवनाथ मित्र मंडळ पिंपळे गुरव गावठाण, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, शिव गणेश तरुण मित्र मंडळ, नेताजी नगर मित्र मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान पिंपळे गुरव कवडे नगर श्री गणेश मित्र मंडळ, नवी सांगवी येथील अखिल क्रांती चौक मित्र मंडळ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाज प्रबोधनपर संदेश दिला आहे. समर्थनगर फेमस चौक समर्थ नगर मित्र मंडळ यांनी कंस वधाचा देखावा सादर केला आहे. चैत्रबन संयुक्त आई प्रतिष्ठान यांनी फुलांची आरास करून फुलपाखरू देखावा व सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक जनजागृतीवर भर दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10305 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..