जुनी सांगवीत मिरवणुकांनी निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत मिरवणुकांनी निरोप
जुनी सांगवीत मिरवणुकांनी निरोप

जुनी सांगवीत मिरवणुकांनी निरोप

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता.६ ः गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...सजविलेले रथ...गर्दीने फुलून गेलेले रस्ते, ढोल ताशांचा गडगडाट...आणि सोबतीला डी.जे.साउंड सिस्टीमचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील सातव्या दिवशी मंडळांनी गणरायाला निरोप दिला. आठवडाभर विविध देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होती. पुण्याच्या धर्तीवर जुनी सांगवीतील मिरवणुका पाहण्यासाठी परिसरातील पंचक्रोशीतून नागरिक,युवक गर्दी करतात.

नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरातील सर्वच मंडळांनी यावर्षी सवाद्य मिरवणूका काढून येथील पवना नदी विसर्जन घाट, अहिल्यादेवी होळकर घाट, मुळा नदी, पवना नदी घाटावर विसर्जन केले. सांगवीतील मधुबन मित्र मंडळ ट्रस्टने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. शितोळेनगर क्रीडा व युवक मंडळाने आकर्षक सजवलेल्या फुलांच्या रथातून सवाद्य मिरवणूक काढली. सिझन सोशल ग्रुप ट्रस्ट व प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या सांगवीचा राजा, मंडळाच्या मिरवणूकीत मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत ढोल ताशा पथकाने वादन केले. बालाजी प्रतिष्ठानने रामरथाचा आकर्षक रथ देखावा सांगवी करांचे लक्ष वेधून घेत होता. ढोल ताशा पथकाने वादन केले. राहिमाई प्रतिष्ठानच्या वतीने हलता देखावा साकारला होता. आनंद नगर मित्र मंडळ, रणझुंजार मित्र मंडळाने फुलांच्या आकर्षक रथातून मिरवणूक काढली. गंगानगर मित्र मंडळ, ढोरे नगर मित्र मंडळ, सुवर्णयुग मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, ममता नगर मित्र मंडळ, लॉयन मित्र मंडळ, मुळा नगर मित्र मंडळ, अभिनव मित्र मंडळ, शिवशक्ती व्यायाम मंडळ, मुळा नगर तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ मुळा नगर, अभिनव नगर मित्र मंडळाने सवाद्य मिरवणुका काढल्या. प्रमुख चौकातून स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, पोलिस मित्र संघटना व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मंडळाचे श्रीफळ, सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. पवना नदी विसर्जन घाटावर महापालिकेच्या आरोग्य स्थापत्य विभागाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. निर्माल्य कलश व नविन विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध चौकातून वाहतूक नियमनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.
--

सकाळपासूनच मिरवणूकांची लगबग, मिरवणूकांचा मार्ग सजावटीच्या कामामुळे मंडळांनी बंद केलेले रस्ते, यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागला. यामुळे गॅस वितरण सेवेलाही कसरत करावी लागली.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10310 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..