‘एकत्रित विकास नियमावलीत पीएमआरडीएचा समावेश करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एकत्रित विकास नियमावलीत
पीएमआरडीएचा समावेश करा’
‘एकत्रित विकास नियमावलीत पीएमआरडीएचा समावेश करा’

‘एकत्रित विकास नियमावलीत पीएमआरडीएचा समावेश करा’

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ८ ः पीएमआरडीएचा सरकारच्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीत समावेश करावा, अशी बांधकाम व्यावसायिक संदीप काटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
राज्य शासनाची ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) अद्याप लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा विकास अद्यापही कागदावरच दिसतो. युनिफाईड डीसीआरमुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होऊन ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होतील. विकासकांना शासनाकडून योग्य दरामध्ये चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध झाल्यास विकासक देखील ग्राहकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून देऊ शकतील. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीत घरे घेण्यास ग्राहक पसंती देतील. पर्यायाने बांधकाम क्षेत्रासंदर्भातील विकासाला बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ चा लवकरात लवकर ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत’ समावेश करावा व त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहरातील बांधकाम व्यावसायिक संदीप काटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘पीएमआरडीए’ चे आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेरील गावांचा सुनियंत्रित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून २०१५ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्यात आली. पीएमआरडीए अंतर्गत सुमारे ७,२५६.४६ चौरस किमी क्षेत्र येते. यातील लोकसंख्या अंदाजे ७२.७६ लाख आहे, ज्यामुळे पुणे महानगर क्षेत्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ महानगर ठरते. मात्र, विकासाच्या उद्दिष्टापासून ‘पीएमआरडीए’ अद्यापही यापासून दूर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10317 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..