तरुणांना रोजगार मिळाल्यास गुन्हेगारी घटणार : अवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांना रोजगार मिळाल्यास 
गुन्हेगारी घटणार : अवताडे
तरुणांना रोजगार मिळाल्यास गुन्हेगारी घटणार : अवताडे

तरुणांना रोजगार मिळाल्यास गुन्हेगारी घटणार : अवताडे

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : ‘सध्या गुन्हेगारीकडे वळलेले तरुण बेरोजगार आहेत. त्यांचे समुपदेशन करून योग्य मार्गाकडे नेण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’ असे मत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) शहरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यात आवताडे बोलत होते. प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक विजय आगम, प्रकाश घोडके, ज्योत सोनवणे, निदेशक मंगेश कत्तपुरे, नीलेश लांडगे, शिवदास  वाघमारे, तानाजी कोडगे, गणेश सुर्वे, किसन खरात, सचिन तापकीर, अरुण बांबळे, मनोज ढेरंगे, जीवन ढेकळे, संजीव अभ्यंकर, जितेंद्र कारवटे, भानुदास दुधाळ आदी उपस्थित होते.     
अवताडे म्हणाले, ‘सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळाल्यास त्यांच्यातील नैराश्य नष्ट होण्यास मदत होते. त्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. गुन्हेगारी क्षेत्राकडे अनवधानाने ओढल्या जाणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे सहज शक्य होईल.’

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10334 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..