सांगवीकरांना सतावते पुराची धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवीकरांना सतावते पुराची धास्ती
सांगवीकरांना सतावते पुराची धास्ती

सांगवीकरांना सतावते पुराची धास्ती

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १७ ः जुनी सांगवी ही पवना व मुळा नद्यांच्या संगमावर वसलेली आहे. दोन्ही बाजूंनी नद्या असल्याने पावसाळ्यात सांगवीतील नागरिकांना पुराची धास्ती असते. गेल्या चार - पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पवना व मुळा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

जुन्या सांगवीतील नागरिकांनी २००५ व २०१९ मध्ये पुराच्या पाण्याचा त्रास सहन केला आहे. २०१९ मध्ये तर सांगवीकरांना दहा दिवस जलकोंडीचा सामना करावा लागला होता. यामुळे येथील मधुबन, मुळानगर झोपडपट्टी, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, मुळानगर नदीकिनारा परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मुळा व पवनाचा जुनी सांगवी येथे संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला दापोडी आहे. २०१९ ला येथील मधुबन सोसायटी, मुळानगर झोपडपट्टी, पवनानगर घाट, जम चाळ, प्रियदर्शनी नगर, शितोळे नगर, शिवांजली कॉर्नर, ममतानगर, संगम नगर, दत्ताश्रम, नवी सांगवी येथील इंद्रप्रस्थ सोसायटी हा भाग मोठ्या प्रमाणावर जलप्रय
झाला होता. रहिवासी भागात पुराचे पाणी घुसले होते. यामुळे येथील महापालिकेच्या शाळांमधून नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. जागोजागी मुळा व पवनानदी पात्रालगत टाकलेले भराव, लोकवस्त्या, राडारोडा यांच्या भरावामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्र अरुंद झालेले आहे. उंच सखल भाग व प्रशासनाची याकडे झालेली डोळेझाक जलकोंडीचे एक कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सांगवीकरांची जलकोंडी होते तेव्हा पवना नदी किनारा भागातील स्मशानभूमी, वेताळ महाराज उद्यान, दशक्रिया विधी घाट पाण्याखाली जातो. तर साई चौक ते माहेश्वरी चौक या भागाला पुराचा फटका बसतो. दापोडीतील सिद्धार्थनगर, पवारनगर, गुलाबनगर, स्मशानभूमी परिसर पुराच्या पाण्याने वेढला जातो.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
ह प्रभागांतर्गत जुनी सांगवी व परिसरातील भागाचा प्रभावी क्षेत्राची पाहणी करून महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. सध्या तरी नदीपात्राबाहेर पाणी नसले तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे व दरवर्षी पावसाळ्यात नदीकिनारा भागातील रहिवाशांत काळजीचे वातावरण असते.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10336 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..