पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीचा खून करून 
पतीची आत्महत्या
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटी घालून तिचा खून केला. त्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मोशीतील गंधर्वनगरी येथे घडली.
शांताबाई शिवराय अहिवळे (वय ५२) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे तर शिवराय तुकाराम अहिवळे (वय ६०, दोघेही रा. गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. अहिवळे दांपत्य हे त्यांचा मुलगा, सून व नातू यांच्यासह येथे राहत होते. शिवराय हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत
होता. त्याचे व पत्नीचे सतत भांडण व्हायचे. दरम्यान, बुधवारी (ता. २१) सकाळी मुलगा व नातू घराबाहेर पडले तर सून काही दिवसांपूर्वी गावी गेलेली आहे. त्यामुळे घरात शांताबाई एकट्याच होत्या. रात्रपाळी करून सकाळी शिवराय कामावरून घरी आल्यानंतर त्याने पत्नी शांताबाईचा
दोरीने गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. खून केल्यानंतर शिवरायने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा दुपारी दीडच्या सुमारास घरी आला असता, दरवाजा आतून बंद होता. काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10345 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..