करसंकलनाची वेबसाइट सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करसंकलनाची वेबसाइट
सुरू करण्याची मागणी
करसंकलनाची वेबसाइट सुरू करण्याची मागणी

करसंकलनाची वेबसाइट सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २३ ः महापालिकेच्या करसंकलन विभागाची कर संकलन वेबसाइट सध्या बंद आहे. संकलन विभागातील संगणक प्रणालीतील नागरिकांसाठी असलेली नावावरून मिळकतकर बिल (घरपट्टी) शोधणे (सर्च) करण्यासाठी या वेबसाइटची मदत होते. मात्र, ती बंद केली आहे. ती परत चालू करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस आयचे शहर सरचिटणीस कुंदन कसबे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, करसंकलन विभागातील संगणक प्रणालीतील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या नावावरून मिळकत कराचे बिल शोधणे ही साइट करसंकलन विभागाकडून बंद करण्यात आली. यामुळे नागरिकांना आपली मिळकतकराची बिले (घरपट्टी बिले) शोधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी मिळकतकराची बिले वाटप झालेली नाहीत.
ऑनलाइनमार्फत मिळकतकराची बिले सर्च करून मिळकतधारक मिळकतकर भरत होते. ती वेबसाइट बंद केल्याने मिळकतधारकास मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पर्यायी मिळकत धारकांना करसंकलन कार्यालयात जाऊन मिळकतकराची बिले शोधावी लागत आहेत. यामुळे करसंकलन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावरही कामांचा ताण पडत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10350 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..