गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

वृद्धाची एक लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : बँकेची बनावट वेबसाइट तयार करून वृद्धाची एक लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ललितकुमार कचरुलाल ओस्तवाल (रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी एसबीआय बँकेची केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली. बँकेची बनावट वेबसाइट तयार केली. फिर्यादीचे इंटरनेट लॉगिन आयडी व पासवर्ड संगणकीय साधनाद्वारे प्राप्त केले. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून परस्पर एक लाख ७ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली.
-------

म्हाळुंगेत प्रेयसीवर वार
पिंपरी : प्रेम संबंधांमुळे होणाऱ्या भांडणाच्या रागातून प्रेयसीवर वार करून जखमी केले. ही घटना म्हाळुंगे येथे घडली. गजानन अंगद चौधरी (वय ३१, रा. म्हाळुंगे) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. २१ वर्षीय तरुणी तिच्या घरी एकटीच होती. दरम्यान, आरोपी याने त्या दोघांमधील प्रेम संबंधांमुळे वारंवार होत असलेल्या भांडणाचा राग मनात धरून तिच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------

कोयत्याने वार करून पादचाऱ्याला लुटले
पिंपरी : पादचारी तरुणाच्या हातावर दोन चोरट्यांनी कोयत्याने वार करून २८ हजार ३०० रुपयांची रोकड लुटली. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी सेहबुद सैफुद्दीन शेख (वय ३०, रा. शास्त्रीनगर, पिंपरी, मूळ - झारखंड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे चुलते सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास डॉ. आंबेडकर चौक, पिंपरी येथून शास्त्रीनगर येथे पायी चालले होते. थिसेन ग्रुप कंपनीसमोरून जात असताना दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यांच्या खिशातून २८ हजार ३०० रुपयांची रोकड काढून पसार झाले.
--------

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड उड्डाणपूल येथे करण्यात आली. विजयकुमार श्रीकृष्ण चौधरी (वय ३०, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला गांजा पुरविणारा बंटी साळुंके (रा. दांडेकर पूल, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी चौधरी याने गांजा बाळगल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून विजयकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११ हजार ५०० रुपये किमतीचा ४९० ग्रॅम गांजा, दोन हजारांचा मोबाईल, ६०० रुपयांची रोकड असा १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
------------------------

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा
पिंपरी : तरुणीचा सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या तरुणावर भोसरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य विजय उपाडे (रा. शांतिनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा आहे. तो तरुणीला ‘तू मला आवडतेस, माझ्याबरोबर गाडीवर बस, माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे बोलून घरापासून कॉलेजपर्यंत पाठलाग करायचा. मोबाईलवर कॉल करून तिला सतत त्रास द्यायचा. १७ सप्टेंबर रोजी ती आईला सोबत घेऊन परिक्षेसाठी गेली. पेपर सुटताच घरी जात असताना तिचा हात पकडून ‘तू मला आवडतेस, तू माझीच आहेस’, असे म्हणत विनयभंग केला. तसेच तुला व तुझ्या आईला बघून घेईन, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10351 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..