सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक फौजदाराला 
नोकरी घालवण्याची धमकी
सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी

सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : ड्यूटीवर असलेल्या सहायक फौजदाराला नोकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अनिकेत मनोज चव्हाण (वय २८, रा. कवडेनगर, नवी सांगवी), अक्षय संभाजी शिंदे (वय २३, रा. कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव), ओंकार सुधाकर घाडगे (रा. कवडेनगर, नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सहायक फौजदार विजय सर्जेराव शेलार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सांगवी पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असताना आकाश सचिन भापकर हा तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला. दरम्यान, आकाश याचे मित्र असलेले आरोपी तेथे आले. आकाशाची तक्रार घ्यायची नाही असे म्हणत अरेरावीची भाषा केली. ‘तुमची नोकरी घालवतो’, अशी फिर्यादीला धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10353 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..