Fri, Feb 3, 2023

मुले पळविणारी टोळी
शहरात सक्रिय नाही
मुले पळविणारी टोळी शहरात सक्रिय नाही
Published on : 25 September 2022, 2:00 am
पिंपरी, ता. २५ : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोठेही लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पालकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे ऑडिओ, व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
असा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, घटनेबाबत शहानिशा करून घ्यावी. तसेच अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय कुठेही व्हायरल करू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.