नवी सांगवीत नवरात्र उत्सवाचा जागर सुरू विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी सांगवीत नवरात्र उत्सवाचा जागर सुरू
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नवी सांगवीत नवरात्र उत्सवाचा जागर सुरू विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नवी सांगवीत नवरात्र उत्सवाचा जागर सुरू विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २९ ः नवी सांगवी येथे कोल्हापूरची प्रतिकृती असलेल्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाचा जागर सुरू आहे. या निमित्ताने मंदिर ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे दाक्षिणात्य मंदिर सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्चून लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती ही महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्तीप्रमाणेच या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यावर श्री गणेश व महादेवाची पिंड बसविण्यात आलेली आहे. आकर्षक असे मंदिर असून, नित्यनेमाने या ठिकाणी कोल्हापूरच्या अंबाबाईचे ठिकाणी होत असलेल्या विधिवत पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.
शुक्रवारी कुंकुमार्चन विधी ललिता सहस्त्रनाम श्री सूक्त पठाण होणार आहे. शनिवारी सकाळी ११ ते २ या वेळेत दुर्गा सप्तशती पाठ संस्कृत सिद्ध लक्ष्मी महिला मंडळ सदस्यांच्यावतीने सादर करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरला मोफत प्राणशक्ती उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३ तारखेला सोमवारी अष्टमी होम हवन सकाळी ८ वाजता होणार आहे. मंगळवारी (ता. ४ ) खंडेनवमी व शस्त्र पूजन व घट हलवणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडेसातला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवारी (ता. ५) दसरा उत्सव कोल्हापूरच्या धर्तीवर या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी आरती व सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. ९) कोजागरी पौर्णिमा दूध व प्रसाद वाटप महिलांचा भोंडल्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव पटेल यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्ट सर्व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने परिश्रम घेतले जात आहेत.

फोटोः 14324