उपनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
उपनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

उपनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ६ ः विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, जुनी सांगवी येथे पथसंचलन करण्यात आले. पिंपळे सौदागर येथे सकाळी पावणे आठ वाजता सघोष पथसंचलनास आकाश गंगा रोड, कोकणे चौक येथून सुरुवात करण्यात आली. पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर येथे समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक धनेश मुनोत उपस्थित होते. जुनी सांगवी येथे गजानन महाराज मंदिर मैदानावरून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. सांगवी नगर कार्यवाह संजय लोहकरे, विशाल सांगळे यांनी पथसंचलनाचे संचलन केले. पिंपळे गुरव येथे राजमाता जिजाऊ गार्डन, लक्ष्मीनगर, भालेकर नगर, महाराष्ट्र बॅंक चौक मार्गे काटेपुरम चौकातून राजमाता जिजाऊ गार्डन येथे समारोप करण्यात आला. भारतीय जनता पार्टी व विविध संघटना नागरिकांच्या वतीने पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी ध्वजपूजन करण्यात आले. चंद्ररंग ट्रस्टचे उद्योजक विजय जगताप, भाजप चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माऊली जगताप यांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले.