जुन्या सांगवीत ५१ फुटी रावणाचे दहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या सांगवीत ५१ फुटी रावणाचे दहन
जुन्या सांगवीत ५१ फुटी रावणाचे दहन

जुन्या सांगवीत ५१ फुटी रावणाचे दहन

sakal_logo
By

जुन्या सांगवीत ५१ फुटी रावणाचे दहन


जुनी सांगवी,ता.६ ः विजयादशमी निमित्त सांगवी येथे विजयादशमीनिमित्त पीडब्ल्यूडी मैदानावर ५१ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहन पाहण्यासाठी पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, विविध पारंपरिक खेळ, भोंडला, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अश्विनी जगताप, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप यांनी महिलांसाठी भोंडला, पारंपरिक खेळ, नृत्य, गाणी, मनोरंजन अशी सांस्कृतिक मेजवानी दिली. कोरोनाच्या संकट काळामुळे गेली दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला." जय श्रीरामचा जयघोष, भारत माता की जय अशा गाण्यांवर रावण दहनाच्या उत्सवात तरूणाई थिरकली. यावेळी बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या, नवरात्र म्हणजे मनःशक्ती व साधनेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीतील सण, उत्सव परंपरा व खेळांचे जीवनात मोठे महत्त्व आहे.
वाईट विचारांचे दहन म्हणजे रावण दहन. प्रभु रामांनी रावणाचे पतन केले. वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय हेच रावण दहन होय.
फोटो ओळ- सांगवी येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने ५१ फुटी रावण दहन उत्सवास जमलेली गर्दी.