पिंपळे सौदागरात दांडिया महोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे सौदागरात दांडिया महोत्सवाचे आयोजन
पिंपळे सौदागरात दांडिया महोत्सवाचे आयोजन

पिंपळे सौदागरात दांडिया महोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

पिंपळे सौदागरात दांडिया महोत्सवाचे आयोजन
जुनी सांगवी, ता.६ ः पिंपळे सौदागर येथील सोसायटीतील नागरिक आणि भाविकांसाठी नवरात्रीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे आणि नीलेश काटे युवा मंच्या वतीने, सलग तीन दिवस ''भव्य दांडिया महोत्सव २०२२ ''चे आयोजन करण्यात आले.
गुजराती गरबा व लोकगीते यांच्यासोबतच साऊंड ट्रॅकवरील दांडिया नृत्यासोबत सारेगमपा फेम गायक मयुरेश वाघ यांच्या गायनावर तरुणाई थिरकली. या महोत्सवाचे उद्‍घाटन माजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. रंगीत दिव्यांची रोषणाई आणि सुमधूर संगीताच्या तालावर सहभागी स्पर्धकांसह नागरिकांनी मोठ्या जल्लोषात दांडियांचा आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योजक संदीप काटे, नीलेश काटे युवा मंचाचे अध्यक्ष नीलेश काटे, आरती तुतारे, श्वेता खोरगडे, अनिता ज्ञानेश्वर काटे, गावातील ग्रामस्थ, विविध सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात उत्कृष्‍ट जोडी, उत्कृष्‍ट नृत्य, उत्कृष्‍ट वेशभूषा, उत्कृष्‍ट बाल नृत्य, उत्कृष्‍ट बाल वेशभूषा या गटांत सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. महिलांमध्ये अंजली मालकवडे, वेदश्री रासने या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिता काटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.