शिवार चौकातील रोपे जळाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवार चौकातील रोपे जळाली
शिवार चौकातील रोपे जळाली

शिवार चौकातील रोपे जळाली

sakal_logo
By

पिंपळे सौदागर, ता. १७ : शिवार चौकातील रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आणलेली रोपे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळून गेली आहेत. त्यामुळे, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारूपाला आलेले आहे. शहरातील विविध रस्त्यांचे महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांचेही सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे वृक्षारोपणासाठी आलेली रोपे तशीच पडून आहेत. त्यातील अनेक रोपे जळून गेली आहेत. त्यामुळे, नागरिकांनी नाराजी व्यक्त केला आहे. याबाबत नागरिक सुधीर शिंदे म्हणाले की, ‘‘महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून आपल्याला कोणीच विचारायला नाही. असाच त्यांचा ग्रह झाला आहे. अशा प्रकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा कररुपी पैसा वाया जात आहे.’’