Pimpri-Chinchwad काळेवाडीत बीआरटी मार्गाला बकालपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BRT
काळेवाडीत बीआरटी मार्गाला बकालपणा

Pimpri-Chinchwad : काळेवाडीत बीआरटी मार्गाला बकालपणा

काळेवाडी : काळेवाडी बीआरटी मार्गावरील पथदिव्यांच्या खांबांवर विविध राजकीय पक्षांचे झेंडे व जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे, या मार्गाला बकालपणा आला आहे. महापालिकेने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काळेवाडी फाटा ते मोशी-आळंदी रस्त्याला जोडणारा बीआरटी मार्ग काळेवाडीतून जातो. या रस्त्यावरून शहरासह उपनगर व इतर भागांतील वाहने ये-जा करतात. मात्र, या प्रशस्त अशा मार्गावर लावलेले फ्लेक्स व राजकीय पक्षांचे झेंडे खराब झाले आहेत.

हे फ्लेक्स आणि झेंडे रस्त्याच्या पर्यायाने शहराच्या सौंदर्याला बाधा करणारे ठरत आहेत.