Rahatani स्वच्छतागृह नियमित साफ ठेवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

toilet Clean
स्वच्छतागृह नियमित साफ ठेवण्याची मागणी

Rahatani : स्वच्छतागृह नियमित साफ ठेवण्याची मागणी

रहाटणी : येथील तलाठी कार्यालयाजवळील स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तलाठी कार्यालयात काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक विविध शासकीय कामांसाठी येत असतात. तसेच येथे आधार केंद्र, शेजारी बसथांबा व मुख्य चौक असल्याने मोठी वर्दळ असते.

त्यामुळे, हे एकमेव स्वच्छतागृह पुरेसे ठरत नाही. मात्र, या स्वच्छतागृहाची स्वच्छताच होत नसल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. बसथांबा व तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाक दाबूनच येथून जावे लागते.

ज्येष्ठ नागरिक सुखदेव गुरव म्हणाले,‘‘एका बाजूला महापालिका स्वच्छ भारत अभियानाचा दिंडोरा पिटत आहे. तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे. सरकार बदलले, अधिकारी बदलले. परंतु, कारभारात तिळमात्र बदल झाला नाही.’’