आर्थिक साक्षरता मंचकडून कष्टकऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक साक्षरता मंचकडून 
कष्टकऱ्यांचा सत्कार
आर्थिक साक्षरता मंचकडून कष्टकऱ्यांचा सत्कार

आर्थिक साक्षरता मंचकडून कष्टकऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ३० ः पिंपरी-चिंचवड शहर अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा सन्मान करून दिवाळीनिमित्त फराळ व मिठाई भेट देण्यात आली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित राहत असलेल्या कर्मचारी व कामगारांना शहराध्यक्ष कमलाकर जाधव यांच्या हस्ते दिवाळी भेट देण्यात आली. यात स्मशानभूमी, उद्यान, लसीकरण केंद्र, शाळा स्वच्छता कर्मचारी आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.