पिंपळे सौदागरमधील पदपथ खचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे सौदागरमधील पदपथ खचले
पिंपळे सौदागरमधील पदपथ खचले

पिंपळे सौदागरमधील पदपथ खचले

sakal_logo
By

पिंपळे सौदागर, ता. २९ : येथील बीआरटी मार्ग ते कुंजीर चौक रस्त्यावरील जरवरी सोसायटीसमोरील पदपथ खचले आहे. त्यामुळे, स्मार्ट सिटी योजनेतून झालेल्या या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड हे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आले. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. त्याचाच भाग पिंपळे सौदागर परिसरातही स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. यातीलच जरवरी सोसायटीसमोरील १८ मीटर रूंद प्रशस्त अशा कॉक्रीटीकरण रस्त्याची उभारणी करण्यात आली. पदपथ तयार करण्यात आले. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या या रस्त्यावरील पदपथ खचले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अपूर्ण असताना पदपथ खचले असल्याने नागरिकांनी रस्त्याच्या कामावरील गुणवत्तेवर सवाल उपस्थित केला आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी स्थापत्य विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, ‘‘रस्त्याचे काम सुरू असताना कोणीतरी जास्त वजनाचे वाहन पदपथावर चढवले असेल. त्यामुळे, पदपथ खचला असेल. तरी माहिती घेऊन पदपथ पूर्ववत करण्याच्या सूचना देणार आहे.’’

PIM22B14493