श्रीधरनगरमधील रस्त्याचे काम बंदोबस्तात होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीधरनगरमधील रस्त्याचे
काम बंदोबस्तात होणार
श्रीधरनगरमधील रस्त्याचे काम बंदोबस्तात होणार

श्रीधरनगरमधील रस्त्याचे काम बंदोबस्तात होणार

sakal_logo
By

रहाटणी, ता. ३१ : मूळ जागामालकाच्या विरोधामुळे श्रीनगरमधील (प्रभाग क्र. २७) आदिनाथ कॉलनी रस्त्याचे काम चार महिन्यांपासून ठप्प आहे. मात्र, आता महापालिका या रस्त्याचे काम पोलिस बंदोबस्तात करणार आहे.
सर्व्हे न. ६५ मधील या कॉलनीत सुमारे दोनशे कुटुंब राहतात. जलवाहिनी व सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. मात्र, हा रस्ता पूर्ववत न केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. त्यात पावसामुळे या रस्त्याची जास्त दुर्दशा झाली. मागील एक वर्षापूर्वी येथील रहिवासी खराब रस्त्यामुळे अडचणी सहन करत आहेत. महापालिकेने चार महिन्यांपूर्वी या रस्त्याचे क्राँक्रीटिकरण सुरू केले. परंतु, मूळ जागामालकाने कामाला विरोध केल्याने महापालिकेने रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले.
येथील रहिवाशांनी महापालिकेकडे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने रस्त्याचे काम पोलिस बंदोबस्तात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गट्टूवार यांनी ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कामासाठी मूळ जागामालकाचा विरोध लक्षात घेता काम पोलिस बंदोबस्तात करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागाकडील पोलिस बंदोबस्त देण्यात यावा.

‘‘अस्तित्वातील डांबरी रस्ता क्राँक्रीटिकरण करण्याचे काम स्थापत्य विभागामार्फत सुरू आहे. मात्र, या कामाला मूळ जागामालकाचा विरोध असून बाधित क्षेत्राचा मोबदला मिळण्याची त्यांची मागणी आहे. परंतु, हा रस्ता मंजूर विकास योजनेतील नसल्याने तसेच या रस्त्याचे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले असल्याने या क्षेत्राचा बदला देणे शक्य नाही.’’
- डी. एन. गट्टूवार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

फोटो- PIM22B14510