विविध योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप
विविध योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप

विविध योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २ ः पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून ५० लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य योजनेचे पेन्शन पत्र व मिठाई भेट देण्यात आली. यात ३० विधवा, १० ज्येष्ठ नागरिक, दोन मूकबधिर, आठ अपंग लाभार्थ्यांना पेन्शन पत्र व मिठाईचे वाटप करण्यात आले.
भाजपचे चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप म्हणाले, ‘‘चिंचवड विधानसभा क्षेत्रात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेणाऱ्यांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. विविध समित्या समाजकल्याणकारी योजना लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी चांगले काम करीत आहेत. माजी महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, संजय मराठे, दिलीप गडदे, टाटा मोटर्सचे कामगार प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, कुंदा गडदे, रवी खोकर, पंकज सारसर उपस्थित होते.