आठ जुगार अड्ड्यांवर छापा तब्बल ३२ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठ जुगार अड्ड्यांवर छापा
तब्बल ३२ जणांना अटक
आठ जुगार अड्ड्यांवर छापा तब्बल ३२ जणांना अटक

आठ जुगार अड्ड्यांवर छापा तब्बल ३२ जणांना अटक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून देहूरोड, निगडी व वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल ३२ जणांना अटक झाली आहे.

लॉटरी सेंटर, व्हिडिओ गेम पार्लर, सोरट जुगार या अड्ड्यांवर ही कारवाई केली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन कारवाईत बाळू काळे (वय ३२), फिरोज शेख (वय ३६), सोहेल शेख (वय २२), समीर शेख (वय ४८), गणेश खंडेलवाल (वय ५६), सौदागर शिंदे (वय ५०) या सहा जणांना अटक केली. तर हरिश विठ्ठल तिटकारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत विश्वजीत सिन्हा (वय ३६), भिमराव म्हेत्रे (वय ५२), दत्तात्रय देढे (वय ६०), रमेश भोसले (वय ५६), वसंत चांदे (वय ६०), मुनिंदर सिन्हा (वय ३६), किशोर जाधव (वय ५२), आयुब बेग (वय ६८), कांताराम कोरडे (वय ६२), सूरज शिरसाट (वय २४), शरद केसवानी (वय ३३), नामदेव जामदार (वय ७२), सुरेश गणूरकर (वय ७२), काळूराम लोंढे (वय ६८), चंद्रकात बोडके (वय ५१), ज्ञानदेव निकम (वय ७२), रमाकांत सोमवंशी (वय ५८), विजयकुमार शर्मा (वय ३२), कुंदन शर्मा (वय २७), रामचंद्र बनगर (वय ५९), चंद्रजित भोसले (वय ५०), उद्धव भोसले (वय ५२), अनिल जाधव (वय ३२), कल्याण अहिरे (वय ६९), किसन डोंगरे (वय ३५), दिलीप गायकवाड (वय ४२) या २६ जणांना अटक केली आहे. तर, जुगारअड्डा मालक बंटी ऊर्फ केतन बदाम मुसळे यच्यासह एकूण पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोरट जुगार चालविणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.