रस्त्यांची चुकीची कामे दुरुस्त करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची चुकीची कामे
दुरुस्त करण्याची मागणी
रस्त्यांची चुकीची कामे दुरुस्त करण्याची मागणी

रस्त्यांची चुकीची कामे दुरुस्त करण्याची मागणी

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १७ ः पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. एकच काम वारंवार दुरुस्त करून, चुकीच्या पद्धतीने केली गेली असल्याने आमचा विकास कामांना विरोध नाही. मात्र, चुकीची झालेली कामे सुधारावेत, अशी मागणी जुनी सांगवी येथील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या परिसरात अनेक ठिकाणी कामे झाली आहेत व काही ठिकाणी अजूनही दुरुस्ती चालू आहे. स्मार्ट सिटी योजना शहराच्या दृष्टीने चांगली असली तरी देखील काम करण्याच्या पद्धती व सल्लागारांनी चुकीच्या पद्धतीने केलेले नियंत्रण व नियोजन यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचे अतोनात नुकसान झालेले दिसून येईल. पिंपळे गुरव व सांगवी हद्दीवरील महाराजा हॉटेल चौकासमोरील दापोडी पुलाकडून सांगवी व पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या चौकामध्ये काही महिन्यांपूर्वी काँक्रिट पेव्हींग ब्लॉक लावून, चौकाचे सुशोभीकरण व संपूर्ण काम करण्यात आले होते. अचानक दोन-तीन दिवसांपूर्वी हे ब्लॉक काढण्यात येऊन, त्या जागी दुसऱ्या पद्धतीचे ब्लॉक लावण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रशासन व इतर संबंधित व्यक्तींना या कामाची चौकशी करून चुकीच्या पद्धतीने काम करणारे सल्लागार यांच्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच कामास मान्यता देणाऱ्या व्यक्तींवरदेखील कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.