आरोग्य विभागाची शुन्य कचरा कार्यशाळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागाची शुन्य कचरा कार्यशाळा संपन्न
आरोग्य विभागाची शुन्य कचरा कार्यशाळा संपन्न

आरोग्य विभागाची शुन्य कचरा कार्यशाळा संपन्न

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. १९ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि. ''ड'' व ''ह'' क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आयोजित क्षमता बांधणी व शून्य कचरा प्रशिक्षण कार्यशाळा पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त विजय कुमार थोरात ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, अतुल सोनवणे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, सतीश पाटील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, रश्मी तुंडलवार, प्रणय चव्हाण उपस्थित होते. सफाई मित्र कर्मचारी यांच्यासाठी क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ बाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सदर कार्यक्रम हा शून्य कचरा या संकल्पनेवर राबविण्यात आला.