दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग बांधवांसाठी विशेष 
रोजगार मेळाव्याचे आयोजन
दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २२ ः कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा व महाराष्ट्रात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे द न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल समर्थनगर नवी सांगवी येथे आयोजन केले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता. ४) डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या रोजगार मेळाव्यास सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.