गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

पिंपरीत चुलत्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुतण्यावर गुन्हा
पिंपरी : धनादेशचा दुरुपयोग करून चुलत्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय भाऊसाहेब वाघेरे (रा.पिंपरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उदय याने त्याचे चुलते सुधीर वाघेरे यांच्या धनादेशाचा दुरुपयोग करून खात्यावरील ३४ लाख आठ हजार स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेत फिर्यादीच्या वडिलांची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्यावरील दोन कोटी ९९ लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर करून घेत इतरांच्या खात्यावर वळविले. यामध्ये फिर्यादीच्या वडिलांची तसेच फिर्यादी व त्यांचे भाऊ चेतन वाघेरे यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१० ते जानेवारी २०१३ या कालावधीत पिंपरीतील पवना बँकेत घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------
मारहाण करून सोनसाखळी हिसकावली
पिंपरी: मोटार चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एकाने मोटार चालकाला मारहाण केली. त्यानंतर त्याची गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी हिसकावली. ही घटना आळंदी येथे घडली. याप्रकरणी संजय भीमराव डोंगरे (वय ४३, रा. बिबवेवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे देहूफाटा आळंदी येथून त्यांच्या मोटारीतून प्रवास करत होते. त्यांनी मोटारीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून आरोपीने डोंगरे यांना मारहाण केली. त्यानंतर डोंगरे यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी आरोपीने जबरदस्तीने हिसकावून घेतली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी: भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्‍याचा मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथे पुणे - मुंबई महामार्गावर घडली. नंदकुमार विठोबा साखरे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्‍याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश इंद्रभान साखरे (वय २६, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे चुलते नंदकुमार हे पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी बीआरटी बस स्टॉप जवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------
दागिने, पैशाचा अपहार केल्याप्रकरणी पत्नीवर गुन्हा
पिंपरी: दागिने व पैशांचा अपहार करून पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ वर्षीय पतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची पत्नी (वय ३१) व तिचा प्रियकर तौफिक रियाज राही (वय ५९) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी याच्या पत्नीचे आरोपी तौफिक यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना लग्न करणे शक्य नव्हते. त्यामुळे महिलेने फिर्यादी सोबत लग्न केले. लग्नानंतर देखील तिने तौफिक यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. तौफिक याने एका अनोळखी महिलेला फिर्यादीस फोन आणि मेसेज करायला सांगून फिर्यादीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीची पत्नी सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, अंगठी, कानातले टॉप्स व रोकड असा ४९ हजार ८०० रुपयांचा ऐवज घेऊन तौफिक सोबत पळून गेली.
-----