ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कोत्तापल्ले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कोत्तापल्ले यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कोत्तापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कोत्तापल्ले यांचे निधन

sakal_logo
By

पिंपळे सौदागर, ता. १: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण साहित्यिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यातील रुग्णालयातून डॉ. कोत्तापल्ले यांचे पार्थिव त्यांच्या पिंपळे सौदागर येथील निवासस्थानी आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ.अविनाश अवलगावकर, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. धनंजय भिसे, प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांची कन्या गीतांजली जोशी, स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे, विजयाताई कोत्तापल्ले (पत्नी), नितीन कोत्तापल्ले (मुलगा), शिल्पा कोत्तापल्ले (सून), अपर्णा शेळके (मुलगी), शर्वरी कोत्तापल्ले (नात) यांच्यासह साहित्यिक क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आले.