महापालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा घेराव भामा आसखेड जॅकवेल कामातील निविदा रद्द करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा घेराव  
भामा आसखेड जॅकवेल कामातील निविदा रद्द करण्याची मागणी
महापालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा घेराव भामा आसखेड जॅकवेल कामातील निविदा रद्द करण्याची मागणी

महापालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादीचा घेराव भामा आसखेड जॅकवेल कामातील निविदा रद्द करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप आक्रमक झाली आहे. भामा आसखेड धरणातील जॅकवेल कामाच्या सुमारे १२० कोटी रुपयांची निविदा १५१ कोटींना देण्यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रहार केला. तब्बल ३१ कोटी रुपयांची मलई खाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील असंख्य कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभागात सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांना त्यांच्याच कार्यालयात बुधवारी ( ता. ३०) घेराव घातला. घोषणा देत कार्यकर्त्यांनी बाहेरचा परिसर दणाणून सोडला.

आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष नाना काटे, माजी नगरसेवक वैशाली काळभोर, मयूर कलाटे, पंकज भालेकर, माया बारणे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, विक्रांत लांडगे, अनुराधा गोफणे, श्याम लांडे, पंकज भालेकर, सुलक्षणा शीलवंत, सतीश दरेकर तसेच शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, विनोद नढे, फजल शेख, सतीश दरेकर, देविदास गोफणे आदी सहभागी झाले होते.

भामा आसखेडच्या जॅकवेल कामात दोनवेळा निविदा मागवण्यात आल्या आणि दोन्ही वेळा एकसारखे दोन कंत्राटदारांनीच निविदा भरल्या. मे. गोडवाना इंजि. व मे. टी.एन.टी आणि दुसरी मे. श्रीहरी असो. व मे. एसबीएम प्रोजेक्टस् अशा दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. अनुभवाची अट पूर्ण करत नसल्याने मे. श्रीहरी असो व मे. एसबीएम या कंपनीला अपात्र ठरविण्यात आले. मे. गोडवाना इंजि. व मे. टी.एन.टी या कंपनीलाच हे काम मिळाले आहे. या कंत्राटासाठी भाजपच्या एका आमदाराचा आटापिटा सुरू असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. अजित गव्हाणे यांनी त्याबाबत आयुक्तांना पत्र दिले आणि ही निविदा रद्द करण्याची मागणी केली. या सर्व घडामोडीत प्रशासनाची भूमिका आणि विशेषतः पाणी पुरवठा विभागातील सह शहर अभियंता यांची घाई संशयास्पद वाटल्याने राष्ट्रवादीने आज त्यांनाच घेराव घातला.
घेराव आंदोलनानंतर सर्वांनी मिळून महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना निवेदन दिले आणि करदात्यांच्या पैशावरचा हा दरोडा थांबवा, निविदा रद्द करा, अशी मागणी केली.

फोटो ः 14651