दापोडीतील हुतात्मा भगतसिंह शाळेचे बदलतेय रूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोडीतील हुतात्मा भगतसिंह 
शाळेचे बदलतेय रूप
दापोडीतील हुतात्मा भगतसिंह शाळेचे बदलतेय रूप

दापोडीतील हुतात्मा भगतसिंह शाळेचे बदलतेय रूप

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २ ः दापोडी परिसर हा पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार तर काही भाग वस्ती-चाळीचा कष्टकरी, लघु उद्योजक येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने येथे महापालिकेच्या वतीने हुतात्मा भगतसिंह शाळेचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काम प्रगतिपथावर असून सहा मजली इमारतीपैकी सध्या चार मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. ३८५८.८५ चौ.मी. व ४७२३ चौ.मी. जागेत विकसित होत असलेल्या या शाळेत १५२० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांच्या दोन बॅच या शाळेत भरविल्या जातात.

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शाळा होणार डिजिटल
स्मार्ट वर्गखोल्या, मध्यवर्ती भागात क्रीडांगण, प्रार्थना हॉल, क्रिडा कक्ष, स्वच्छता गृहे, विश्रांती कक्ष, कर्मचारी कक्ष, भांडार कक्ष, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, यासारख्या आवश्यक सुविधा व ई लर्निंग लायब्ररी, प्रयोगशाळा, स्वतंत्र लेडीज रूम, कार्यालय, डायनिंग रूम हॉल अशा आवश्यक मार्गदर्शक रूप समोर ठेवून शाळेचं रुपडं बदलत आहे. वर्गखोल्यांची वर्गवारी वयानुसार सुविधा उपलब्ध करून करण्यात येणार आहे. नर्सरीपासून त्यातील वर्गखोल्या आणि इतर फर्निचर वयोगटानुसार बसविण्यात येणार आहेत.

स्मार्ट बालेवाडीसाठी पाच वर्ग भरवले जातात. स्मार्ट सिटीअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शाळा स्मार्ट बनविण्यात येत आहेत. स्मार्ट टिव्ही, इ-लर्निंग सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या दोन मजले सर्व सुविधांनी पूर्ण झाले असून इतर मजल्यांचे वर्गखोल्या फरशी, जिन्याचे टप्पे आदी कामे सुरू आहेत.

‘‘नवीन शाळा इमारतीसोबत विद्यार्थ्यांना सेवा सुविधा चांगल्या दर्जाच्या पुरविल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे. दापोडी परिसरात कष्टकऱ्यांची मुले-मुली मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. तर एकूण २२ शिक्षक, कर्मचारी सेवेत आहेत.’’
- कल्पना डुंबरे, मुख्याध्यापिका

‘‘शाळेचे काम प्रगतिपथावर असून स्मार्ट डिजिटल शाळा महापालिकेकडून उभारण्यात येत आहे. शैक्षणिक मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व सेवा सुविधा या शाळेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.’’
- सुनील दांगडे, अभियंता, स्थापत्य विभाग