रहाटणीत दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटणीत दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात
रहाटणीत दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात

रहाटणीत दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात

sakal_logo
By

रहाटणी, ता. २ : दत्त मित्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त सोहळ्याचे आयोजन केले आहे. १ डिसेंबरपासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून ७ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तनाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यादरम्यान वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक सुदाम नखाते यांनी दिली आहे.

आज (ता. ३) सायंकाळी ६ वाजता अलिबाग ते नारायणपूर पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत होणार आहे. रविवारी (ता. ४) सकाळी ६ वाजता पालखी प्रस्थान होणार आहे. सोमवारी (ता. ५) श्रीनगर, रहाटणी येथील सरस्वती महिला भजनी मंडळाचे दुपारी २ ते ४ दरम्यान कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता मच्छिंद्र महाराज कुंभार (धानोरकर) यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवारी (ता. ६) दुपारी २ ते ४ दरम्यान पिंपळे सौदागर येथील गुरुमाऊली महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता संग्राम (बापू) भंडारे-पाटील यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी (ता. ७) सकाळी ६ वाजता अभिषेक होणार आहे. ७ ते ९ दरम्यान नवग्रह पूजन व होमहवन, सकाळी १० वाजता ग्रंथ पूजन व मिरवणूक, सकाळी ११ वाजता सामूहिक माधुकरी फेरीचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी १ ते ३ दरम्यान चांगुणा महिला भजनी मंडळ रहाटणी यांचा कार्यक्रम तर सायंकाळी ४ वाजता संजय महाराज पाचपोर यांचे जन्माचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता जन्म सोहळा व महाआरती होणार आहे. सात नंतर महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.