रहाटणीत विनापरवाना झाडांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटणीत विनापरवाना झाडांची कत्तल
रहाटणीत विनापरवाना झाडांची कत्तल

रहाटणीत विनापरवाना झाडांची कत्तल

sakal_logo
By

रहाटणी, ता. ३ : झाडांची अडचण होती म्हणून थेट झाडांचीच कत्तल करण्यात आली असून काही झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तोडून त्यांना बोडके करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार तापकीर मळा चौकातील काका रेजेन्सीत या सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. कायद्यानुसार सोसायटीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मानांकानुसार झाडे लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार या सोसायटीच्या बाजूला झाडे लावली, ती झाडे मोठीही झाली. मात्र, फरशा उचकटत आहेत, फांद्यांची अडचण होते, म्हणून या सोसायटीने थेट झाडेच तोडली आहेत. महापालिका हद्दीत विनापरवानगी कोणतेही झाड तोडता किंवा त्याच्या फांद्या छाटता येत नाहीत. याबाबत सोसायटीतील रहिवासी म्हणाले की, झाडांची अडचण होत होती. त्यामुळे परवानगी घेऊन झाडे तोडली आहेत. मात्र, परवानगी पत्र पाहण्यास मागितले, असता रहिवासी व सोसायटीचे अध्यक्ष टाळाटाळ करत आहेत.

कायदा काय सांगतो?
विनापरवाना वृक्षतोड करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, अथवा झाड जाळणे असे कोणतेही वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा गुन्ह्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार रुपये ५, ०००/- पर्यत दंड आणि १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे.

मानकाप्रमाणे मिळकतीमध्ये किती वृक्ष असावेत?
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार मिळकतीत किती वृक्ष असावेत याबाबतचे ठरवलेले मानांकन खालीलप्रमाणे :

१) १०० चौरस मीटर पर्यत (१ गुंठा) - १ वृक्ष
२) १०१ चौरस मीटर ते २०० चौरस मीटर (२ गुंठे) - २ वृक्ष
३) २०१ चौरस मीटर ते ३०० चौरस मीटर (३ गुंठे) - ३ वृक्ष
४) ३०१ चौरस मीटर ते ४०० चौरस मीटर (४ गुंठे) - ५ वृक्ष
५) ४०१ चौरस मीटरच्या पुढे प्रत्येक १०० चौरस मीटरला - १ वृक्ष