Tue, March 21, 2023

अवजड वाहनांना
रेल्वे पुलावरून बंदी
अवजड वाहनांना रेल्वे पुलावरून बंदी
Published on : 3 December 2022, 3:47 am
पिंपरी, ता. ३ : चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा रेल्वे पूल कमकुवत झाला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या पुलावरून पीएमपीएल बससह अवजड वाहनांना रविवारपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
या मार्गऐवजी महावीर चौकातून खंडोबा माळ, बिजली नगर,रिव्हर व्ह्यू मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. हा बदल रविवारपासून लागू होणार आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने केले आहे.