विभागीय रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद
विभागीय रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद

विभागीय रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ४ ः रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग कौशल्य विकास रोजगार विभागीय आयुक्तालय पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विद्यमाने रविवार (ता. ४) न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पं. दिनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास विविध परिसरातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पाच हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत खासगी आस्थापनेतील पाच हजारहून अधिक नोकरी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मेळाव्याचे उद्‍घाटन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, भाजप चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, प्रतिभा महिला प्रतिष्ठान अध्यक्ष जयश्री जगताप, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आयुक्तालय उपायुक्त अनुपमा पवार, दिव्यांग आयुक्तालय उपायुक्त संजय कदम आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह संपूर्ण भाजपचे कार्यकर्ते माजी नगरसेवक पदाधिकारी संपूर्ण टीमने सक्रिय योगदान दिले. जगताप म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्यासाठी शासनस्तरावर देखील प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या वतीने ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोचत नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.’’
या रोजगार मेळाव्यामध्ये सातवी ते पदव्युत्तर, आयटीआयपासून ते अभियंतापदवी घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मेळाव्यामध्ये सात हजार तीनशेहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार होते. त्यामुळे बेरोजगार तरुण, तरुणींनी येथील रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.