कुटुंबाला जिवे मारण्याची सुपारी देऊन मागितली वीस लाखाची खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंबाला जिवे मारण्याची सुपारी देऊन
मागितली वीस लाखाची खंडणी
कुटुंबाला जिवे मारण्याची सुपारी देऊन मागितली वीस लाखाची खंडणी

कुटुंबाला जिवे मारण्याची सुपारी देऊन मागितली वीस लाखाची खंडणी

sakal_logo
By

पिंपरी : महिलेकडून व्हॉटसअ‍ॅपवरून वीस लाख रुपयांची खंडणी मागत संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मोरवाडी येथे घडला. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका मोबाईलक्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या मोरवाडी येथे त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅपवर हिंदी भाषेत एक मेसेज आला. त्यामध्ये ''मला तुझ्यासह तुझी दोन मुले, पती अशा पूर्ण कुटुंबाला मारण्याची सुपारी मिळाली आहे. तुला कुटुंब महत्त्वाचे असेल तर उद्या रात्रीपर्यंत २० लाख रुपयांची व्यवस्था कर, अन्यथा मी माझे काम करेल. पैसे नाही तर तुमचा जीव याचे उत्तर आज रात्रीपर्यंत मिळाले पाहिजे, असा धमकीवजा एमएमएस पाठवण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

एक किलो गांजा जप्त; एकाला अटक
बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. आरोपीकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वराळे येथे करण्यात आली. जोहान वर्गिस क्कनट्टू अलेक्झांडर (वय २५, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे) असे आरोपीचे गाव आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार आरोपीच्या घराबाहेरील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपीकडे ३१ हजार १२५ रुपये किमतीचा एक किलो २८५ ग्राम गांजा व सातशे रुपयांची रोकड असा एकूण ३२ हजार ८८५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


निगडीत मोबाईल हिसकावला
पत्नीसोबत मोबाईलवरून व्हाटसअ‍ॅप कॉलवर बोलत असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी एकाच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. ही घटना भोसरी-निगडी टेल्को रस्त्यावर क्वॉलिटी सर्कल चौकात घडली. याप्रकरणी इजाज शरीफ शेख (रा. सतारा परिसर, संभाजीनगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख हे पत्नीसोबत मोबाईलवरून व्हाटसअ‍ॅप कॉलवर बोलत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शेख यांच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.


नंबरप्लेटवर तरुणीचे नाव टाकणे पडले महागात
दुचाकीच्या नंबर प्लेटवर तरुणीचे नाव टाकणे तरुणाला चांगलेच महागात पडले . तरुणीचा विनयभंग करून बदनामी केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. समीर राजू शिरसाठ (वय १९, रा.बालाजी नगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीला आरोपी समीर हा नोव्हेंबर महिन्यापासून त्रास देत होता. तरुणीचा कॉलेजपासून तो पाठलाग करीत असे. त्याने दुचाकीच्या नंबर प्लेटवर तरुणीचे आणि स्वत:चे नाव लिहून तरुणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टोळक्याकडून मोटार चालकाला मारहाण
दुचाकीला कट मारला म्हणून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. हा प्रकार चिंचवड स्टेशन चौकात घडला. या प्रकरणी नंदकुमार नामदेव जोगदंड (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोगदंड हे त्यांच्या मोटारीतून रुपीनगर येथे जात होते. चिंचवड स्टेशन चौक येथे पाच जण तीन दुचाकीवरून आले. त्यांनी जोगदंड यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावली. ''तू आमच्या दुचाकीला कट का मारला, असे म्हणत जोगदंड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.