साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती, सांगवीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार 
आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती, सांगवीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती, सांगवीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती, सांगवीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २४ ः राज्य सरकारने महाराष्ट्रातील साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार केला आहे. आता नर्सरी ते महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांचा आणि नंतर राज्यातील सर्व पुरूषांचा आरोग्य डेटा तयार केला जाणार आहे. राज्यातील नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस सरकार हे पहिले सरकार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
सांगवी येथे आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दोन दिवसीय मोफत अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सावंत बोलत होते.
यावेळी नारायणपूरचे नारायण महाराज, माजी महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराताई घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, शिबिराचे आयोजक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त डॉ. सुधीरकुमार बुक्के, उपआरोग्य संचालक डॉ. राधाकृष्ण पवार, कॅम्प नियोजक डॉ. धर्मेंद्र कुमार, औंध ऊरो रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली, हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. मनोज दुराईराज, वायसीएम रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र वाबळे, सहआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत पळशीकर, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ पंकज सुगांवकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. विश्वास डाके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विलासराव लांडगे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून शिबिराची सुरवात झाली. २०१९ मध्ये या महाआरोग्य शिबीरात तब्बल २ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. ३१ हजार रुग्णांना प्रत्यक्ष उपचार दिले होते. पावणे दोनशे रुग्णांची अँजिओप्लास्टी मोफत करून दिली गेली. सध्या सुरू असलेल्या शिबीरात ४८ हॉस्पिटल आणि ५५० डॉक्टर्स व त्यांची टीम उपलब्ध आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री
१) कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत आहे.
२ ) नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून काही बंधने पाळावीत.
३) राज्यातील ९५ टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत.
४) ६० ते ७० टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतले आहेत.
५) लसीकरणामुळे इतर राज्य आणि देशांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली

फोटोः 14785