
आदित्य, संस्कृती, संपदा यांचा पदके मिळवल्याबद्दल सन्मान
रहाटणी, ता. २६ : विविध ठिकाणच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत आदित्य मल्लिकार्जुन बुक्की, संस्कृती म्हातोबा कुंजीर आणि संपदा म्हातोबा कुंजीर यांनी पदके मिळविल्याबद्दल स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्याप्रसंगी देविदास तांबे, नाना कुंजीर, ज्ञानदेव गायकवाड, बबन सातपुते, अर्जुन पेटकर, राजेश ढवण, सदाशिव कुंजीर, सी. ए. तांबोळी, मल्लिकार्जुन बुकी, तात्या शिनगारे आदी उपस्थित होते.
आदित्य याला थायलंड येथील एशियन किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये कास्य पदक आणि अझरबैजाण येथील आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक तसेच रशिया येथे आयव्ही जागतिक मास रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये आठवे स्थान मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय थ्रोबॉल संघात निवडून आलेल्या संस्कृती हिने क्वालालंपूर, मलेशिया येथे १५ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान विश्व थ्रोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये महिला गटासाठी उपविजेतेपद ट्रॉफीसह रौप्य पदक तसेच भारतीय पुरुष संघाने तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीसह कांस्यपदक जिंकले. भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांच्या प्रशिक्षक संपदा यांना ‘विश्व थ्रोबॉल चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.
रहाटणी ः आदित्य बुक्की, संस्कृती कुंजीर व संपदा कुंजीर यांचा सत्कार करताना स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टचे देविदास तांबे.
फोटो ः 14798