शिवजयंतीनिमित्त नाना काटे यांच्या मंडळांच्या गाठीभेटी - मतदारांशी साधला संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीनिमित्त नाना काटे यांच्या मंडळांच्या गाठीभेटी - मतदारांशी साधला संवाद
शिवजयंतीनिमित्त नाना काटे यांच्या मंडळांच्या गाठीभेटी - मतदारांशी साधला संवाद

शिवजयंतीनिमित्त नाना काटे यांच्या मंडळांच्या गाठीभेटी - मतदारांशी साधला संवाद

sakal_logo
By

नाना काटे यांच्याकडून
विविध मंडळांना भेटी

पिंपरी, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाना काटे यांनी रविवारी (ता. १९) ठिकठिकाणी मंडळांना भेटी दिल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
काटे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडली आणि यशस्वीही करून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उत्कृष्ट प्रशासनात समाजातील बारा बलुतेदारांना मानाचं स्थान होतं. त्यांनी कधीही जाती-धर्माचा भेदभाव केला नाही. मात्र, त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना सर्वच स्तरावरील लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. समाजाच्या सर्वच घटकांना सोबत घेतलेल्या महाविकास आघाडीलाच मतं द्या.’’
यावेळी त्यांनी संत निरंकारी सत्संग भवनालाही भेट दिली. ज्योतिबानगर रोड, रहाटणी येथील कार्यालयात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, सायली किरण नढे, विनोद नढे, शिवाजी काळे, संतोष कोकणे आदी उपस्थित होते.

विविध संघटनांचा पाठिंबा
‘आरपीआय’चे महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांनी नाना काटे यांची भेट घेऊन, त्यांना पाठिंबा दिला. यावेळी राजेंद्र तुळशीराम आठवले, कैलाश जोगदंड, प्रियदर्शनी निकाळजे, विकास साळवे, अंकुश चव्हाण, नितीन पटेकर, लता कांबळे, चंद्रकांत ओहळ यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर अखिल भारतीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनीदेखील नाना काटे यांना पत्राद्वारे पाठिंबा दिला.
फोटोः 15089