राष्ट्रीय सेवायोजना शिबिरात घोरवडेश्वर डोंगरावर निसर्गसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय सेवायोजना शिबिरात 
घोरवडेश्वर डोंगरावर निसर्गसेवा
राष्ट्रीय सेवायोजना शिबिरात घोरवडेश्वर डोंगरावर निसर्गसेवा

राष्ट्रीय सेवायोजना शिबिरात घोरवडेश्वर डोंगरावर निसर्गसेवा

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २७ ः स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभागाच्या वतीने देहूरोड जवळील घोरवडेश्वर डोंगरावर हरित घोरवडेश्वर प्रकल्पांतर्गत मागील काही वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे काम सुरू आहे. या उपक्रमात विविध संस्था संघटनांचा सहभाग राहिला आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील सेवा योजनेमधील सुमारे २५० विद्यार्थी या ठिकाणी श्रमदान करून निसर्गसेवा करणार आहेत.
कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांचे सात दिवसाचे शिबिर घोरवडेश्वर डोंगर, अमरजाई मंदिर परिसर सोमवार (ता. २७) फेब्रुवारी ते रविवार (ता. ५ मार्च) या कालावधीत रोज सकाळी दहा ते सायंकाळी तीन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात रोज ५० विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग सहभागी होणार असून शिबिरात खालील प्रमाणे निसर्ग सेवा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये डोंगरावरील प्लास्टिक व इतर पर्यावरणाला घातक कचरा गोळा करणे व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, लहान झाडांना आळी करणे, चर दुरुस्ती व नवीन चर व खड्डे बनविणे आदी उपक्रम श्रमदानातून राबविले जाणार आहेत. तसेच शिबिरार्थींना सह्याद्रीतील विशेषतः घोरवडेश्वर येथील वनस्पतीची ओळख करून देण्यात येणार आहे. निसर्ग मित्र विभागातर्फे सचिव विजय सातपुते, लाला माने समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. सर्व निसर्ग प्रेमींनी या शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे व त्यांच्या कामाला हातभार लावावा, असे निसर्ग मित्र विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.