गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

काम सोडल्याची विचारणा केल्याने एकाला बेदम मारहाण
पिंपरी, ता. १ : गॅरेजमधील काम का सोडले, अशी विचारणा केल्याने चौघांनी एकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना पिंपरी कॅम्प येथे घडली. इम्रान सादिक तांबोळी (वय ३६, रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहेब, दानिश, इरफान अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी इम्रान हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसह कपडे खरेदी करण्यासाठी पिंपरी कॅम्पात गेले होते. तिथे त्यांना एक तोंड ओळखीचा मुलगा दिसला. त्याला इम्रान यांनी गॅरेजमधील काम का सोडले, अशी विचारणा केली. त्यावरून त्या मुलाच्या चार साथीदारांनी इम्रान यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात इम्रान यांच्या खांदा, डोके, हाताला दुखापत झाली.
-------
६८ हजाराचे साहित्य लंपास
पिंपरी, ता. १ : देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ असलेल्या स्टोअर रूममधून चोरट्यांनी ६८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
रामकृष्णा जनार्दनराव हडपा ( रा. आर्मी क्वार्टर्स, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड येथील सिग्नल रेजिमेंट
आर्मी स्टेशन हेड क्वार्टर जवळ केटी लाइन्स बिल्डिंगमध्ये आर्मीचे स्टोअर रूम आहे. या रूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील ६८ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य लांबवले.

-------
तरुणीचा पाठलाग करीत गैरवर्तन
पिंपरी, ता. १ : तरुणीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी लोखंडे (रा.रुपीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरूणीकडे आरोपी सनीने प्रेमाची मागणी केली. त्याला तरुणीने नकार दिला. तरीही सनी तरुणीचा पाठलाग करीत तरुणीशी गैरवर्तन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com