महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनानिमित्त
बॉक्सिंग स्पर्धा
महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धा

महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धा

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ९ ः जागतिक महिला दिनानिमित्त कै. भीमराव जवळकर विकास संस्था कासारवाडी यांच्यावतीने महिला बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन मंजिरी कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना प्रतिभा रघुनाथ जवळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनने महिला चषक पटकाविला. स्पर्धेत अन्वेषा शिंदे, कन्हैया कलशेट्टी, तनुष्का कलशेट्टी, ऋतुजा सोनकांबळे, पलक ओसवाल, श्रद्धा प्रसाद, वैष्णवी शिंगोटे, साक्षी कराळे, कल्याणी खोंडगे, अनुष्का साठे, मयूरी साठे, अस्मिता साठे, ऐश्वर्या साठे, प्रणाली शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल कांबळे, ज्ञानेश्वरी साळुंखे, अवनी हांडे, तन्वी गव्हाणे, चैत्राली लांडगे यांनी विशेष कामगिरी केली.
देवेंद्र सिंग यादव, सदानंद साबळे, विश्वजीत कांबळे, अमोल निचळ यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी रघुनाथ जवळकर, डॉ. मदन कोठुळे, राष्ट्रीय पंच मुष्टीयुद्ध सचिन शिंगोट, किरण सूर्यवंशी, संगीता मस्के, पूजा डिसिल्वा, स्मिता सालपेकर, आरती सोनवणे आदी उपस्थित होते.


कासारवाडी ः जागतिक महिला दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या.
फोटोः 15142