सांगवी, नवी सांगवीत शिवजयंती उत्साहात - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवी, नवी सांगवीत शिवजयंती उत्साहात -
सांगवी, नवी सांगवीत शिवजयंती उत्साहात -

सांगवी, नवी सांगवीत शिवजयंती उत्साहात -

sakal_logo
By

नवी सांगवी परिसरात
शिवजयंती उत्साहात
जुनी सांगवी, ता. १० ः नवी सांगवी आदर्श नगर येथील जगदंब युवा प्रतिष्ठान, ओम साई ग्रुप यांच्यावतीने अखिल नवी सांगवी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जगदंब युवा प्रतिष्ठानची शिवजयंती आपल्या दिमाखदार सजावट आणि समाजप्रबोधनासाठी नावाजली जाते. या वर्षी देखील आकर्षक सजावटीच्या जोडीने शिवरायांच्या सर्वधर्म सहिष्णू वृत्तीचा जागर करण्यात आला. संध्याकाळी महाराजांच्या आरतीनंतर स्थानिक ढोल ताशांच्या पथकांकडून स्थिर वादन तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आकर्षक रोषणाई करून वातावरण शिवमय झाले होते. जुनी सांगवी येथील वेताळ महाराज सोसायटी परिसरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना पाचारण करण्यात आले होते. आश्रमातील मुलांनी योगासनांची विविध प्रकार सादर केले. वेदांग ठोंबरे यांनी तबला वंदन करून महाराजांना मानवंदना दिली. बालशिवाजींच्या रूपात गोजिरी खटावकर व सोसायटीतील बालगोपालांनी महाराजांच्या शिकवणींना उजाळा दिला. आश्रमातील मुलांना श्रीमती विठोबाई शितोळे यांच्या हस्ते भेटवस्तू व सोसायटीतील सर्व सदस्यांनी अन्नधान्य स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी मनीषा योगेश शितोळे, कृष्णा शितोळे, गोजिरी खटावकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

नवी सांगवी ः जगदंब युवा प्रतिष्ठान व ओम साई ग्रुपच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.
फोटो ः 15150