ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी
ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी

ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्याने वाहतूककोंडी

sakal_logo
By

ट्रकमधील माल रस्त्यावर
पडल्याने वाहतूककोंडी
पिंपरी : ट्रकमधील मालाची पोती रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. ही घटना बुधवारी (ता. १५) चिंचवडहून पिंपरीकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमध्ये घडली. ट्रक हटवल्यानंतर सात तासांनी वाहतूक सुरळीत झाली. हा ट्रक चिंचवडहून पिंपरीच्या दिशेने जात होता. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पोती भरलेली होती. दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास ग्रेडसेपरेटरमधील अंडरपासच्या स्लॅबला ट्रकचा छत घासल्याने ट्रकमधील माल रस्त्यावर पडला. यानंतर चालक पसार झाल्याने ट्रक रस्त्यातच उभा होता. यामुळे एका लेनच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दुसऱ्या लेनमधून संथगतीने वाहतूक सुरू असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी ट्रक मालकाशी संपर्क साधला. साडे तीनच्या सुमारास ट्रक मालक आल्यानंतर ट्रक बाजूला घेतला. त्यानंतर सात तासांनी वाहतूक सुरळीत झाली.