लॉन्ड्री संघटनेच्या विभाग अध्यक्षपदी विनोद पोतेकर

लॉन्ड्री संघटनेच्या विभाग अध्यक्षपदी विनोद पोतेकर

पिंपळे सौदागर, ता. १७ : रहाटणी-पिंपळे सौदागर लॉन्ड्री संघटना विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी विनोद पोतेकर, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुळे, सचिवपदी संतोष गोतावळे व कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रभाकर सोनटक्के, परमेश्वर पैठणकर, सुशील काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेची वार्षिक सभा सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच नवीन आर्थिक वर्षांमध्ये कपड्याचे दर वाढवण्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी विलास व्यवहारे, विशाल जाधव, राहुल शेलार, अब्दुल कलाम, अमोल मोरे, विक्रम जाधव, कल्याण व्यवहारे, वकील कनोजिया, बालाजी वाघमारे, गणेश गोरे, दत्तात्रेय सौदागर आदी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल शेलार यांनी केले. तर आभार गणेश गोरे यांनी मानले. नवीन आर्थिक वर्षांमध्ये एक शर्ट पॅन्ट २० रुपये, लेडीज ड्रेस ३०, अर्जंट कपडा इस्त्री १५, ड्राय क्लीन शर्ट पॅन्ट प्रती नग ६०, ड्राय क्लीनसाठी साडीचा दर साडी पाहून, असे दर ठरविण्यात आले. अशी माहिती शहर लॉन्ड्री संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com